सेवा निवृत्त पोलीस उपाधिक्षकांच्या घरी घरफोडी ; ९ लाखांचा ऐवज चोरला
खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी. पी. पाटील यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे घडली.
यात सोने, चांदी व रोख रक्कमेचा समावेश आहे. ते २८ रोजी गावाहून परतले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्यात आला. चाळीसगाव विभागाचे वापी अभयसिंह देशमुख यांनी ही घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञ व श्वानपथक मागवून परिसर पिंजून काढण्यात आला. निवृत्त पोलीस अधिक्षकाकडे झालेल्या या चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम