कुसुंबा येथून १८ वर्षीय युवक बेपत्ता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | तालुक्यातील कूसूंबा येथून १९ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

हितेश दिपक पाटील हा शिक्षण घेत असून २८ ऑक्टोंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणाला काही एक न सांगता हितेश कोठेतरी निघून गेला, पून्हा परतला नाही, सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने हितेश याचे वडील दिपक रामचंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात खबर दिली असून त्यावरुन बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उंची पाच फूट, शरीराने मजबूत, अंगात काळे रंगाचे टी शर्ट, काळी जिन्स, पॅन्ट असे हितेश याचे वर्णन आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like