गोलाणी मार्केटमधून दुचाकी लांबविली
खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | गोलाणी मार्केटमधून साई सागर दुकानासमोरून एकाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरूननेल्याची घटना घडली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंटी साजनदास कुकरेजा (वय-२४) रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांचे गोलाणी मार्केट येथील साई सागर नावाचे दुकानअसून २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दुचाकी (एमएच १९ सीएच १३४१) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने२५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आले.याबाबत बंटी कुकरेजा यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार चव्हाण तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम