सोनीनगरातून २२ वर्षीय तरुण बेपत्ता
खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | २२ वर्षीय तरुण घरात कुणाला काहीही न सांगता पिंप्राळा परिसरातील सोनीनगरातून बेपत्ता झाला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
दर्शन नरेश चौधरी (वय-२२) रा. सोनी नगर, पिंप्राळा असे या तरुणाचे नाव आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता बाहेरून फिरून येतो असे सांगून घरातून निघून गेल्यानंतर रो परत आला नाही त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दर्शन हा कुठेही मिळून न आल्याने अखेर रामानंदनगर पोलीसस्टेशनला खबर दिली.पोलीस नाईक कालसिंग बारेला तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम