मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे महाआरोग्य शिबीर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | येथील मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराचे मंगळ ग्रह मंदिर येथे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे आयोजित तीन दिवशीय महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उन्मेष पाटील हे अध्यक्षस्थानी होते. हे शिबीर ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सुमारे पंधराशे रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळणार आहे. यावेळी व्यासपीठावर आ. अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, अखिल भारतीय रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोते, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बारणे, सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, रोशन मराठे, संचालक भास्करराव काळे, निवेदक भाऊसाहेब कोकाटे, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश झाल्टे, प्रकल्प संचालक नंदू रायगडे, विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य दिलीप पाटील, जि. प. सदस्य प्रताप पाटील, डॉ. हर्षल माने, सदस्या जयश्री पाटील, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत उपस्थित होते.

प्रास्ताविक रोशन मराठे यांनी केले. यावेळी उन्मेष पाटील, अनिल पाटील, अशोक शिंदे, सुरेश कोते, संतोष बारणे, स्मिता वाघ यांनी मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए.सोनवणे तसेच सर्व सेवेकरी परिश्रम घेत आहेत. डीगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like