… तर आम्ही भरलेला कर आम्हाला परत करा – श्रीधर चौधरी
खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | गेल्या दहा वर्षांमध्ये रस्ता झालेला नाही मग आम्ही भरलेला कर आम्हाला परत करा अन्यथा मनपा समोर सोमवारी उपोषण करण्याचा इशारा शिवाजीनगरातील रहिवाशी श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मागील दहा वर्षापासून जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात एकही रस्ता महापालिका प्रशासनाने तयार करण्यात आलेला नाही. परिसरात अस्वच्छता असून वेळेवर पाणीपुरवठा होत नाही या व अशा अनेक समस्या मनपा प्रशासन, लोकप्रतिनीधी सोडवत नसतील तर आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत करा या मागणीसह शिवाजीनगरातील समस्यांबाबत शनिवारी तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती.आम्ही दहा वर्षापासून भरलेला कर आम्हाला परत मिळावा यासाठी सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी महापालिका इमारतीसमोर सकाळी अकरा वाजता उपोषण केले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधिक्षकांना १४ ऑक्टोबरला निवेदन दिले. परंतू याची कोणीच दखल घेतलेली नाही अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम