पिंप्री प्रचा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । एरंडोल तालुक्यातील पिंप्री प्र.चा. येथे ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच जयश्री बबन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सरपंच जयश्रीताई पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला . याप्रसंगी गावातील बचत महिला गटाच्या महिला मुली व. ग्रामसेवक इंगळे ,सदस्य मधुकर पाटील ,वॉटरम्यान गोपाल पाटील, संगणक चालक सूर्यकांत पाटील, विलास पाटील बबन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like