गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात व्यसनाधिनतेवर मार्गदर्शन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ३ व ४ जानेवारी २०२३ रोजी व्यसनाधिनता या विषयावर व्याख्यानासह चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ.मयूर मुठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनाधिनेचे शरिरावर होणारे दृष्परिणाम, व्यसन सोडविण्यासाठी त्या व्यक्‍तीसह कुटूंबियांचे समपुदेशन कसे करावे याबाबत डॉ.मुठे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, बहि:शाला शिक्षण मंडळ व गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या संयुक्‍त विद्यमाने मंगळवार, ३ व बुधवार ४ जानेवारी रोजी व्यसनाधिनता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी व वक्‍ता म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ.मयूर मुठे यांची उपस्थीती होती. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, मेडिकल सर्जिकल नर्सिंगच्या प्रो.मनोरमा कश्यप, सायकायट्रिक नर्सिंगच्या विभागप्रमुख प्रो.अश्विनी वैद्य हे होते. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.

याप्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ.मयूर मुठे यांनी कोणत्या वयात कोणत्या व्यसनाच्या आहारी व्यक्‍ती जाते याबद्दल माहिती देत व्यसनाचे प्रकार सांगितले. जसे की, सोशल, सायकोलॉजिकल, बायोलॉजिकलचा यात समावेश आहे. सोशल या विषयात सदर व्यक्‍तीची संगत कशी आहे, तो कोणासोबत बसतो-उठतो ते बघितले पाहिजे, सायकोलॉजिकलमध्ये व्यक्‍ती नैराश्य, ताण-तणावात असते तर बायोलॉजिकल म्हजणे अनुवांशिकरित्या व्यक्‍ती व्यसनाधिन होते. सदर व्यसनाधीन व्यक्‍तीचे व्यसन दूर करण्यासाठी व्यक्‍तीसह त्याच्या कुटूंबियांचेही समुपदेशन करणे गरजेचे असते. यासाठी जाहिरातींवर निर्बंध असायला हवे. तसेच एखादी व्यक्‍ती आपणास कुठल्याही व्यसनाच्या आहारी जातांना आढळली तर आपण त्या व्यक्‍तीला त्याचे दुष्परिणाम समजून सांगावे, समुपदेशन करावे जेणेकरुन प्रलोभनांपासून दूर कसे राहावे याचे ज्ञान होईल असेही डॉ.मुठे यांनी सांगितले.
चर्चासत्राच्या अखेरीस वक्‍ता व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रश्‍नोत्‍तराचा तास झाला. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग महाविद्यालयातील टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफचे सहकार्य लाभले.

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like