उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सवाची सांगता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल सावदा येथे दि. १४ ते २० डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या शिस्तपालनासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची हाऊसनुसार विभागणी व गुणदान केले गेले. ग्रीन हाऊस, रेड हाऊस, यलो हाऊस, ब्ल्यू हाऊस यामध्ये रेड हाऊसने सर्वाधिक गुण मिळवून यशाची पताका फडकविली. स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी स्पर्धकांना १ ३ क्रमांकाचे मानकरी ठरलेले सुवर्णपदक, चंदेरीपदक, ब्रांझपदक व प्रमाणपत्र शाळेच्या प्राचार्य भारती महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. क्रीडा स्पर्धेची सुरुवात मशाल प्रज्वलित करून करण्यात आली. त्यात क्रीडाध्वज फडकविण्यात आला आणि प्रत्यक्ष खेळाला सुरूवात झाली. यामध्ये रनिंग, रेस, संगीत खुर्ची, बास्केट बॉल व बकेट, चमचा गोटी, क्रिकेट अशा स्पर्धा या आठवडाभरात तारखेनुसार वर्ग विभागणी करून घेण्यात आल्यात. २७ डिसेंबर रोजी क्रीडा ध्वज खाली उतरवून क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.
शाळेच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत रेड हाऊस प्रथम व ब्लू हाऊस मधील सहभागी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ट्रॉफी देऊन अभिनंदन केले व पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व स्पर्धांना क्रीडा शिक्षक असलम अली, वसिम शहा, प्रशांत सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like