यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १ जानेवारी रात्री ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मुलीच्या नातेवाईकाने तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कुठेही मिळून आल्याने अखेर फैजपूर पोलीस ठाण्यात धाव त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रभाकर चौधरी करत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम