लाईट बिल भरण्याचे सांगून एकाची फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील तरुणाला लाईट बिल भरण्याचे सांगून ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ४६ हजार ७०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तनवीर अहमद जहांगीरदार (वय-३९) रा. उस्मानिया पार्क, जळगाव हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजता दरम्यान राहत्या घरी असताना त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला इलेक्ट्रिक लाईट बिल भरण्याचे सांगून ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार तनवीरने ॲप्लीकेशन डाउनलोड केले. त्या ॲप्लिकेशनमध्ये एटीएमचा नंबर टाकताच त्याच्या बँक खात्यातून ४६ हजार७०० रुपये ऑनलाईन कमी झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like