बारी समाज वधुवर परिचय मेळावा उत्साहात
खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात रविवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नागवेल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
बारी समाजाचा यंदाचा वधु-वर परिचय मेळावा हा तपपुर्ती मेळावा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शोभा बारी, मंगला बारी, नागवेल प्रतिष्ठानेचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी आदीची उपस्थिती होती.
गुजरात, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २५० पेक्षा जास्त जणांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला होता. तसेच ५० जणांची नव्याने नोंदणी करण्यात आली. असे एकुण ३०० जणांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे. बारी समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले असल्याची माहिती आयोजन प्रा. डॉ. नितीन बारी यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते वर-वधू सूचीचे प्रकाशनही करण्यात आले. यशस्वितेसाठी भूषण बारी, शरद वराडे, अतुल बारी, योगेश बारी, योगेश येऊल, बंटी लावणे, प्रा. दिपक बारी, लतिष बारी, नरेंद्र बारी, प्रकाश रोकडे यांनी परिश्रम घेतले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम