हृदयविकाराचा झटक्याआधी शरीर देते इशारा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | सध्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे अनेकांना अनेक छोटंमोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. सर्वात घातक आजार म्हणजे हृदयरोग हृदयरोगाचे प्रमाण वाढत असताना पाहायला मिळत आहे.

काही संकेत खूप गंभीर असतात. तुम्हाला हृदयरोग किंवा इतर कोणता रोग आहे का? हे दर्शवत असतात. यामधीलच महत्वाचे लक्षण म्हणजे जास्त घाम येणे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात वेगाने घाम येतो.

हृदयविकाराच्या झटका येताना येणारा घाम वेगळा असतो. द हेल्थ साईट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, व्यायामानंतर तसेच वेगात शारीरिक हालचाली केल्यानंतर किंवा उन्हामुळे आपल्याला घाम सुटतो तो सर्वसाधारण असतो.

पण, जेव्हा हृदय (heart) नीट काम करत नाही तेव्हा हा घाम वेगळाच असतो. म्हणजे यादरम्यान सर्वसाधारण घाम येण्याच्या कोणत्याही गोष्टी न करता अचानक शरीराला खूप घाम येऊ लागतो.
यासोबतच या काळात शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. जसे की धाप लागणे, मळमळणे, थकवा येणं आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. याशिवाय शरीराच्या अनेक भागातून जास्त घाम येणे सुरू होते.अशावेळी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारामध्ये बदल करणे गरजेचा आहे. जसे की दररोज १० हजार पावले चालणे, कमी तेलकट अन्न खाणे इ.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like