१२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रीय लोकअदालतीव्दारे ग्राहक प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने क्रिएटिव्ह व्हिडिओ एसएमएस आणि ईमेलव्दारे सोशल मिडिया मोहिमांसह विविध पावले उचलली आहेत.१२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीव्दारे प्रलंबित ग्राहक प्रकरणे निकाली काढण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख एसएमएस आणि 90 हजार ईमेल ग्राहकांना त्यांच्या वकिलांना आणि प्रतिवादी पक्षांना पाठवले गेले आहेत.

काही बँकिंग, विमा, रेल्वे आणि पोस्टल सेवा यासारख्या प्रमुख प्रतिवादींना स्वतंत्रपणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी स्वतंत्रपणे विनंती करण्यात आली आहे.

हे लोकअदालतीव्दारे निकाली काढण्यासाठी योग्य असलेल्या प्रकरणांचे संदर्भ सुलभ करण्यासाठी तयार केले गेले आहे. आतापर्यंत संदर्भ प्रकरणासांठी सुमारे 3000 संमती प्राप्त झाली आहेत. असे ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार रोहित कुमार सिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like