लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

अत्याचारातून पीडिता झाली गर्भवती ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर धमकी देत वारंवार अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती झाली असून आरोपीविरुद्ध चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविणारा राकेश युवराज जिरे(वय २२) याने पिडीताला तुझ्या आई वडिलांना व भावाला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी देत पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती झाली. या प्रकरणी संशयित आरोपी राकेश युवराज जिरे (वय २२) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि धरमसिंग सूदरडे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like