फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला अटक
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करून सह्या करणाऱ्या इतरांवर एमआयडीसी पोलिसांत दाखल असून या प्रकरणातील संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे.
अविनाश पाटील रा. पिंप्राळा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे असून नऊ पैकी चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.इतरांचा पोलीस शोध घेत आहे.
एमआयडीसी परिसरातील सुबोध चौधरी व त्यांचा भाऊ सुनील चौधरी यांची अनुक्रमे समृद्धी केमिकल्स आणि सुबोनिया केमिकल्स नावाची कंपनी आहे समृद्धी केमिकल्स मध्ये विशाल पोपट डोके हा ऑफिस बॉय म्हणून काम कामाला होता. विशाल डोके यांनी दोन्ही कंपन्यांच्या चेकवर बनावट स्वाक्षऱ्या करून ४६ लाख ६७ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केली. बनावट सह्यांचे चेक बँकेतून वटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याफरार असलेला अविनाश कोमल पाटील हा पिंप्राला येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांना मिळाली. त्याला पोलिसांनी नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम