मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा नदीपात्रात मृतदेह आढळला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ । तालुक्यातील भालशिव पिंप्री गावातील रहिवासी असणार्‍या तरूणाचा मासेमारीसाठी गेल्याने नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.

गुलाब बारकु भिल (वय३०वर्ष राहणार भालशिव पिंप्री तालुका यावल) हा तरुण दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपला भाऊ संतोष बारकु भिल याच्यासह तापी नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. यात संतोष भिल हा रात्री आपल्या घरी आला मात्र गुलाब भिल हा त्याचा मोठा भाऊ रात्री उशीरा पर्यंत घरी आला नाही.

यामुळे कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, आज दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह तरंगतांना दिसुन आला.

 

यावेळी मयत गुलाब भिलचा मृतदेह गावातील लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले , यावेळी तो नदीच्या पाण्यात बुडुन मरण पावल्याचे दिसुन आले. त्याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

याबाबत मयताचा भाऊ संतोष बारकु भिल यांने खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष सुर्यवंशी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like