हिमाचल प्रदेश निवडणुकीचा बिगुल वाजला !

१२ नोव्हेंबरला मतदान ; ८ डिसेंबरला मतमोजणी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | हिमाचल प्रदेशमधील विधानसभा कार्यक्रम जाहीर झाला असून १२ नोव्हेंबरला मतदान तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत दिली. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत. गेल्या वेळेस भाजपाने बहुमत मिळवत सत्ता प्रस्तापित केली होती.

१७ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर आहे. २७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज माघारीची शेवटची तारीख ही २९ ऑक्टोबर आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तर मतमोजणी व निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत .

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like