स्वातंत्र्यलढ्यात खान्देशातील क्रांतिकारकांचे योगदान विषयावर व्याख्यान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खान्देशातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर डॉ.बी.एन.पाटील (पाचोरा) यांचे व्याख्यान भाषा अभ्यास प्रशाळेत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे हे असतील तर अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर येथील जी.जी.खडसे महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील हे असणार आहेत अशी माहिती प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like