खान्देशस्तरीय सुगम गायन स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगीत विभागाव्दारे खान्देशस्तरीय सुगम गायन स्पर्धेचे आयोजन १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून सामाजिकशास्त्र प्रशाळेत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी हिंदी किंवा मराठी पैकी कोणत्याही एका भाषेतील गीत हार्मोनिअम व तबल्यावर सादर करावयाचे आहे. स्पर्धेसाठी वयोगट १८ ते ३५ हा ठेवण्यात आला आहे. स्पर्धेची नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी १४ नोव्हेंबर रोजी करावयाची आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक रु.५०००/- व स्मृतीचिन्ह, व्दितीय पारितोषिक रु.४०००/- व स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.३०००/- व स्मृतीचिन्ह व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१०००/- असे तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेसंबंधी ०२५७-२२५७४५८, मो.नं. ९४२३९७३२९९, ९४२२२३५४५८ या वर संपर्क करता येईल अशी माहिती कला व मानवविज्ञान प्रशाळेचे संचालक डॉ. अनिल चिकाटे यांनी दिली आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like