जळगावात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

बातमी शेअर करा

 

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | तांबापुर भागात राहणाऱ्या एका तरुणीचा हात पकडून तिला डोळा मारणाऱ्या दारुड्या व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि ,

१५ वर्षांची एक १५ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह राहत असून १३ रोजी दारूच्या नशेत असणाऱ्या तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख याने तिला डोळा मारून हात पकडून तिला लज्जा उत्पन्न्न होईल अशी वर्तणूक केली. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून तरबेज उर्फ अच्छु इब्राहिम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like