संस्कृती करणार भारताचे ग्रीसमध्ये प्रतिनिधीत्व
खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षात असणारी संस्कृती भिरुडला ग्रीस मध्ये वैद्यकीय सेवांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये या संधीचा लाभ संस्कृतीला घेता येणार असून यामुळे सातासमुद्रापार देशाचाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील डीयूपीएमसीचा डंका वाजविणार आहे.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ मेडिकल स्टुडंट असोसिएशन (आयएफएमएसए) संलग्नित मेडिकल स्टुडंट असोसिएशन ऑफ इंडिया (एमएसएआय) स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅमच्याअंतर्गत दरवर्षी भारतातून निवडक विद्यार्थ्यांना परदेशात जावून वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात आरोग्य सेवा प्रदान आणि आरोग्य यंत्रणा समजून घेण्यासाठी भ्रंमती करण्याची संधी दिली जाते. यंदाच्यावर्षीसुद्धा एमएसएआयतर्फे सप्टेंबर २०२२ मध्ये अर्ज करण्याची संधी होती, त्यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षात असलेल्या संस्कृती प्रमोद भिरुड हिने अर्ज केला होता. नुकतीच १३ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन निवड यादी जाहिर झाली असून देशभरातील ९१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात संस्कृती भिरुडचाही समावेश आहे.
ग्रीस देशातील एकमेव जागेसाठी तिची निवड झाली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान इंटर्नशिप करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तिच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नारायण आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह महाविद्यालयातील स्टाफने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. संस्कृती ही डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड व ज्योत्स्ना भिरुड यांची कन्या आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम