सफल प्रीमियर लीगमध्ये सफल क्रेझी फाईव्ह, सफल स्ट्रायकर्स संघ विजयी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I मुंबई वडाला रोड येथील जे. के. नॉलेज स्पोर्टस सेंटर ट्रर्फ येथे झालेल्या सफल प्रीमीयर क्रिकेट लीगमध्ये महिला संघ सफल क्रेझी फाईव्ह व पुरूष संघ सफल स्ट्रायकर्स संघ विजयी ठरले.

दोघं संघांना मान्यवरांच्या उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले. सस्टेनेबल ऍग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड (सफल) मार्फत आयोजित केलेल्या सफल प्रीमियर लीग च्या पारतोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी . प्रभाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थितीती होती. त्यांच्यासह वित्त अधिकारी परेश शहा, क्रेडीट हेड सुमित कारखानीस, प्रशासकीय अधिकारी सुभाष अहिरे, लिगल हेड आकाश इंदुरकर, एसएमई हेड सुशांत पांडा, ऑपरेशन हेड रविराज बल्लाळ, विक्री विभागातील भास्कर चव्हाण, विनोद गांगुर्डे यांची उपस्थितीती होती.

सफल प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये एकूण दोन महिला संघ व चार पुरुष संघ सहभागी झाले. यावेळी त्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संपूर्ण स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांमधून सफल क्रेझी फाईव्ह हा महिला संघ विजेता ठरला, तसेच पुरुष संघामध्ये सफल स्ट्रायकर्स हा संघ विजेता ठरला, तर सफल लिजंड संघ हा उपविजेता घोषित करण्यात आला. पुरूष गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून आदर्श दिवाणी (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आनंद गुरप्पू तर महिला गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून उत्कर्षा साबळे (मॅन ऑफ द मॅच), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एचआर हेड विना कशेळकर ठरलेत. स्पर्धा समविचाराने, प्रेमभावाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये सफलचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभाकर बोबडे हे सुद्धा समाविष्ट झाले होते. सफल चे एच.आर विभाग व संपूर्ण सफल कर्मचारी यांनी प्राथमिकतेने व सकारात्मक दृष्टीकोनातून योगदान देऊन एक चांगला उपक्रम स्थापित केलेला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व पदाधिकाऱ्यांचे कौतूक प्रभाकर बोबडे यांनी केले.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like