गॅरेज टाकण्यासाठी महिलेचा छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ Iगॅरेज टाकण्यासाठी माहेरहुन १ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी पाचोरा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सुरत येथे सासरच्या मंडळींकडुन शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पती सह सासरच्या पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भिमनगर येथील रहिवाशी फरीनबी हिचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरत येथील फिरोज हमिद टकारी याचे सोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणुक मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींकडुन गॅरेज टाकण्यासाठी माहेरहुन १ लाख रुपये आणावे अशी मागणी फरीनबी हिचा शारिरीक व मानसिक छळ करत वारंवार होवु लागली.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फरीनबी टकारी हिने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत फिरोज हमिद टकारी (पती), हमिद अमिर टकारी (सासरे), नजमा हमिद टकारी (सासु), मोहसिन हमिद टकारी (जेठ) व गौसिया मोहसिन टकारी (जेठानी) सर्व रा. सुरत यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कॉन्स्टेबल शारदा भावसार ह्या करित आहे.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like