जिल्ह्यात रासायनिक खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता- संभाजी ठाकूर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा कमी होत आहे. व खतांची उपलब्धता कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद  दिला आहे.

 

संभाजी ठाकूर म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या रासायनिक खते कमी पडणार नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सध्या ४० हजार मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. मात्र, शेतकरी बांधवांनी विशिष्ट एकाच खताची मागणी करु नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, जळगाव जिल्हा डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष व माफदा पुणे संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ आदी उपस्थित होते.

श्री. ठाकूर पुढे म्हणाले की,जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस कृभको व इतर कंपन्यामार्ङ्गत २००० मेट्रीक टन,१०.२६.२६ इङ्गको कंपनी मार्ङ्गत ०२.१२.२०२२ रोजी ३७०० मेट्रीक टन डीएपी,आर.सी.एङ्ग.कंपनीमार्ङ्गत आज रोजी २१०० मेट्रीक टन १५:१५:१५ खत प्राप्त होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनी उपलब्ध असलेल्या सरळ खतांचा (युरिया,एस.एस.पी.पोट्याश) वापर करुन घणच्या घरी मिश्र खते तयार करुन त्याचा वापर करावा. जळगाव जिल्हा रासायनिक खते वापरण्यात देशात दुसरा तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.त्यादृष्टीकोनातून शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करावा आणि शेण खत किंवा मिश्र खतांचा वापर करुन जमिनीचा पोत राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like