मनपा स्तरीय शालेय हॉकी क्रीड़ा स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्चस्व
![](https://i0.wp.com/khandeshlive.com/wp-content/uploads/2022/12/Sport-News-photo-2.jpg?fit=1404%2C623&ssl=1)
खान्देश लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I १४ वर्ष मुलांच्या गटात गोदावरी विजयी तर १४ वर्ष मुली व १७ वर्ष मुले व मूली उपविजयी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव,जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्पर्धेचा निकालया स्पर्धेत १४ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले, १४ वर्षातील मुली स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल उपविजयी१७ वर्षे मुलांच्या व मुलींच्या गटात गोदावरी स्कूल उपविजयी ठरले. पारितोषिक वितरण समारंभ या क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभासाठी महिला बचत गटाच्या तथा महाराष्ट्र राज्याच्या बेटी बचाव बेटी पढाव च्या माजी समन्वयक प्रा. डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगाव चे प्रमुख फारुख शेख, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, स्पर्धेचे क्रीडा समन्वय सय्यद लियाकत अली, गोदावरीचे क्रीडा संचालक प्रा. आसिफ खान, आदींची उपस्थिती होती.गोदावरी स्कूलच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. क्रीडा मार्गदर्शक प्रा. आसिफ खान व संध्या बनसोड यांचे खेळाडुंना मार्गदर्शन लाभले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम