चिखलफेक करून प्रसिद्ध मिळवणे थांबवा -संजय राऊत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्रातील ताकदीची नावे आहेत. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यावर टीका करत प्रसिद्ध मिळवणे भाजपने थांबवले पाहिजे. तसेच आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्ध मिळवणे भाजपच्या नेत्यांनी देखील थांबवले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. आमच्या प्रश्नांना उत्तर देता येत न्हवते, म्हणून मला १०२ दिवस तुरूंगात डांबले असा आरोप देखील भाजप सरकारवर त्यांनी केला.लोक मोठ्या प्रमाणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर सगळ्यांचाच विश्वास आहे. त्यामुळे आमची शिवसेना पुन्हा ताकदीने उसळी घेणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला .

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like