जळगावातील प्रश्नांसाठी नाथाभाऊ आक्रमक
खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शासनाने 42 कोटी रुपयांचा निधी दिलेला असुन या कामाचा कार्यादेश देण्यात आलेला आहे . जळगावकर नागरिकांचे खराब रस्ते व खड्यांमुळे प्रचंड हाल होत आहेत तरीही मक्तेदाराने अडमुठेपणाची भूमिका घेऊन काम सुरू केले नव्हते . सदरचे काम सुरू व्हावे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टितर्फे निवेदन देणे , घोषणाबाजी करत निदर्शने करणे , आयुक्तांच्या गाडीसमोर झोपणे आदी विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले . तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूचना देऊन मक्तेदाराने कामाला सुरूवात केली . पण सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ठ पध्दतीने व मनमनी करत सुरू आहे अशी तक्रार नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचेकडे केली आहे .
त्याअनुषंगाने आज सदर कामांची पाहणी आमदार खडसे यांनी महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन , आयुक्त विद्या गायकवाड , शहर अभियंता एम.जी. गिरगावकर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे , सूर्यवंशी , योगेश अहिरे व संबंधित अधिकारी यांचे सह केली . सर्वप्रथम जिल्हा न्यायालय ते गणेश कॉलनी पर्यंत सुरू असलेल्या रस्त्यावर जाऊन न्यायालयासमोरचा रस्त्यावर 3 ठिकाणी खोदून पाहणी करण्यात आली त्यानुसार कमी थर टाकल्याचे , कामापूर्वी स्क्रॅपिंग केलेली नसल्याचे व डांबर अत्यंत कमी प्रमाणात टाकलेले असल्याचे तसेच पाणी असुनही काम करण्यात आल्याचे निष्पन्न झाले . छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपूल येथे पाहणीसाठी गेले असता जिल्हा परिषद जवळ पुलाखाली वेस्ट मटेरिअल चे बरेच ढिग पडलेले असुन जिल्हा परिषद व तहसिल कार्यालय यांची भिंत तुटलेली असुन त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे व पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची समस्या भेडसावत आहे तसेच पुलालगतचे सर्व्हिस रोड देखील तयार नाहीत म्हणून नागरिकांना त्रास आहे असे निदर्शनास आले . सर्वात शेवटी प्रभाग क्रमांक 1 येथील राधाकृष्ण नगर येथे जाऊन त्याठिकाणी सुरू असलेल्या wbm कामाची पाहणी करत असतांना स्थानिक नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचायला सुरुवात केली . सदर कामावर मुरुमाऐवजी माती व डस्ट वापरण्यात येत असल्याचे तसेच खडीकरण करण्यासाठी टाकलेली खडी देखील परिमाणापेक्षा खुप मोठी असल्याचे दिसुन आले व वापरलेले मटेरियल निकृष्ठ असुन तरीही त्याचे प्रमाण खुप कमी असल्याचे दिसले . याविषयी आमदार खडसे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला व सदर कामात सुधारणा न झाल्यास संबंधित प्राधिकरणाकडे रितसर तक्रार करण्यात येणार आहे . सदर मक्तेदार हा राजकिय नेत्यांच्या जवळचा असुन राजाश्रय प्राप्त असल्याने , सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे देखील मक्तेदाराशी साटेलोटे आहे . त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या मक्तेदारावर काहीही कारवाई करण्यात येत नाही व मक्तेदाराला पाठीशी घातले जात आहे . याप्रकरणी आमदार , खासदार , पालकमंत्री यांचेही पुर्णतः जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे , म्हणूनच मक्तेदार मनमर्जीने सर्व नियम धाब्यावर बसवुन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे . मक्तेदाराकडे इतके मोठे काम वेळेवर करता यावे अशी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध नाही . याप्रकरणी पालकमंत्री यांनी लक्ष घालत मक्तेदारावर उचित कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावे असेही मत मांडण्यात आले . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्या पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील , रिकू चौधरी , अमोल कोल्हे , डॉ. रिजवान खाटिक , राजू मोरे , ईब्राहिम तडवी सर , भगवान सोनवणे , किरण राजपूत , राहुल टोके , सुशील शिंदे , अशोक सोनवणे , रमेश बहारे , रहीम तडवी , जितेंद्र बांगरे , हितेश जावळे , रफीक पटेल, साजिद पठाण , नरेश शिंदे , किरण चव्हाण , भीमराव सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम