पाचोरा येथे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा सत्कार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील एम.एम. महाविद्यालयात गुरूवारी १० नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को – ऑप बँकचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपस्थित होते.

माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. एल. व्ही. माहेश्वरी यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमा संदर्भात तसेच संस्थेच्या प्रगती संदर्भात आपले मत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. अतुल देशमुख व डॉ.अतुल सूर्यवंशी यांनी मानपत्राचे वाचन केले.

याप्रसंगी संस्था व महाविद्यालय परिवाराच्या वतीने कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राधेश्याम चांडक यांचा मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव अॅड. महेश देशमुख, व्हॉईस चेअरमन विलास जोशी, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश देवरे, संस्थेचे संचालक प्रा. एस. झेड. तोतला, खलील देशमुख, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, संस्थेचे संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील, भागचंद राका, अर्जुनदास पंजाबी, दगाजी वाघ, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी यांनी तर उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like