विलास गावडे यांची विभागीय सहनिबंधकपदी नियुक्ती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका विलास गावडे यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिकपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग, मुंबई यांचेकडील दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार विलास गावडे यांची नियुक्ती केलेली आहे. विलास गावडे हे नोव्हेंबर २०१९ पासून उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका या पदावर कार्यरत होते. श्री. गावडे यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like