चाळीसगाव येथे काय्रदेविषयक जनजागृती महाशिबिराचे आयोजन
खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत नागरिकामंध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांची जनजागृती व प्रचार, प्रसार होण्याकरीता काय्रदेविषयक जनजागृती करण्याकरीता रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. संचालित, नानासाहेब, य. ना. चव्हाण, कला विधीज्ञ व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाशिबिराच्या आयोजनासाठी ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. सभेमध्ये संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व शासकीय विभागांना एक एक स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार असून नागरिकांनी महाशिबिराच्या आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ए.ए. के. शेख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर, जळगाव यांनी केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम