अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खान याला कोठडी
खान्देश लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iछोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम