महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरुन मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक- आ. शिरीष चौधरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरुन मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक सुरु आहे.या बाबत आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशना तारांकीत प्रश्न उपस्थित कारवाईची मागणी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभेतील विविध प्रश्न तारांकीत उपस्थित केले.यामध्ये जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुमारे ५ हजार ५५० महिला लाभार्थ्यांचे सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झालेल झाले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. यासोबत रावेर तालुक्यात १४ हजार जनावरांना लंम्पी या आजाराने १०९ जनावरांचा मृत्यू झाला या बाबत.यावल व रावेर तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त बाबत रावेर तालुक्यातील केळी पिक घेणार्‍या सुमारे ८०० शेतकर्‍यांचे विमा योजनेचे लाखो रुपये विमा कंपनीकडून मिळाला नसल्या बाबत राज्यातील १४९८५ शाळांवर टांगती तलवार असणे बाबत.त्यांनी मुद्दे उपस्थित केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like