गोदावरी फाऊंडेशन व अ.भा.मारवाडी महिला मंडळातर्फे रॅलीतून देहदानाबाबत जनजागृती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I एका विद्यार्थ्याला डॉक्टर बनण्यासाठी एका मृत शरिराची आवश्यकता असते, त्यासाठी देहदान करणे ही गरज आहे, ती ओळखून देहदानाबाबत जनजागृतीसाठी दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांची विशेष उपस्थीती होती.
रुढी-परंपरेनुसार मृत्यू पश्‍चात अंत्यविधी संस्कार केले जातात मात्र मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी देहदान किती आवश्यक असते याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ जळगाव शाखेतर्फे आनंदरामजी बाहेती शाळा, महाबळ व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने शनिवार, २४ रोजी सकाळी मृत्यूपश्‍चात देहदान जागृती रॅली काढण्यात आली. काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी या मार्गावरुन रॅली काढण्यात आली. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.शुभांगी घुले, डॉ.कैलास वाघ, डॉ.दिलीप ढेकळे, डॉ.संतोष झा, डॉ.आलोक कुमार, डॉ.जमीर, डॉ.अनिता यादव यांच्यासह अ.भा.मारवाडी महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत देहदान हेच श्रेष्ठदान असे महत्व पटवून देणर्‍या घोषणा देण्यात आल्यात.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ जळगावच्या अध्यक्षा सुधा खटोड, सचिव दिप्ती अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ.शितल अग्रवाल, गुंजन कांकरिया, अंशू अग्रवाल, प्रियंका शर्मा, शितल कासट, मनीषा दायमा, कल्पना खटोड, सोनल गांधी, सुषमा झंवर, सुनिता मुंदडा, अल्पना शर्मा, लता कांकरिया, नितू सोनी, प्रविणा मुंदडा, किर्ती दायमा आदिंचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like