पेट्रोल डिझेल विषयी सामान्य नागरिकांना लवकरच बसणार मोठा झटका
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती २००८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.
गेल्या सुमारे १२३ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. अशातच सध्या स्थिर असलेल्या दरांमुळे पेट्रोल कंपन्यांना प्रति लिटर २३ रुपये तोटा होत आहे. १० मार्च रोजी देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल २५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. दहा दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १५ ते २२ रुपयांनी वाढ होऊ शकते.मुंबईत पेट्रोल ११० रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर
भारतातील सामान्य लोकांना लवकरच एक मोठा झटका बसणार आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने महसूल कमी होत असल्याने सरकारकडे पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे. एकीकडे प्रवास महाग होणार असताना दुसरीकडे मालवाहतुकीचा खर्चही वाढणार असून, त्याचा थेट परिणाम दैनंदिन गोष्टींवर होणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम