“चला जाऊया पाडळसरे धरणावर” आ.अनिल पाटीलांचे भावनिक आवाहन
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | जळगाव शहरातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनी’च्या काळात धरणाचे बंद असलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामास सर्व धरण प्रेमींच्या सदिच्छा मिळाव्यात म्हणून आ.अनिल पाटील यांनी दि 6 रोजी धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित केला होता.
यानिमित्ताने त्यांनी तमाम पाडळसरे धरण प्रेमी आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवाना “चला जाऊया पाडळसरे धरणावर” असे भावनिक आवाहन केले होते, रविवारी ६ मार्च सकाळी 9.30 वाजता हा धरण पाहणी दौरा पार पडला.
आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. अनिल पाटील म्हणाले, धरणाचे प्रत्यक्षात आतमध्ये काँक्रीटीकर काम सुरू झाल्याने आनंद झाला आहे. मागील पाच वर्षात शासनाकडून धरणाचे काम ठप्प होते, परंतु या महाविकास आघाडी शासनाच्या काळात पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी दोन वर्षात सातत्याने बैठका झाल्या 90 ते 95 टक्के तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. आता काँक्रीट काम सुरू झाल्याने प्रत्येक पेअर 10 मीटर पर्यंत मे पर्यंत पूर्ण होईल, एकूण 156 मीटर पर्यंत पिअर्स काम पूर्ण झाल्यावर मग धरणाचे वरचे कामही सुरू केले जाईल.
युक्रेन व रशिया युद्धमुळे खर्च वाढूही शकतो. राज्य शासनाकडून 25 हजार कोटी कर्जाची केंद्रा शासनाकडे मागणी आहे, त्यातून निधी मिळू शकतो याशिवाय थेट केंद्राच्या योजनेत बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आतापर्यंत 495 कोटी रुपयाचा खर्च धरणावर झाला आहे, धरणाची आजची किंमत 3200 कोटी झाली आहे. मात्र पुढच्या मार्च पर्यंत 700 ते 800 कोटी निधी खर्च होईल असे स्पष्ट सांगितले आहे.
धरणाचे काँक्रीटीकर कामासाठी पाणी उचलण्याकरता लिफ्ट देखील आवश्यक असल्याने येथे 5 लिफ्ट योजना मंजुर करण्यात आली त्यासाठी सब स्टेशनची मागणीही वीज कंपनीकडे केली आहे, या धरणामुळे 40 हजार हेक्टर अमळनेर तालुक्यातील जमीन ओलीत खाली येणार आहे. आजूबाजूचे जिल्हे आणि तालुक्यांनाही फायदा होणार आहे. जिल्ह्यातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी लक्ष दिले असते तर कामास गती येऊन आज हे पाणी आपण वापरू शकलो असतो. परंतु हे काम पूर्ण झाले नाही अशी खंत आमदारांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, प्रमुख उपस्थिती माजी आ.डॉ बी एस पाटील, चोपडा’चे माजी आमदार कैलास पाटील, चोसाका चेअरमन घनश्याम पाटील,आशा चावरिया, माधुरी पाटील व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच राजकीय, सामाजिक पदाधिकारी ,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोदभैय्या पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अधीक्षक अभियंता वाय के भदाणे, ग्रंथालय विभागाच्या रिता बाविस्कर, सुनीता पाटील, प्रा. रंजना देशमुख, योजना पाटील, कविता पवार, उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम