प्रत्येक पक्षात नारद असतो, पाटीलांनी नाव न घेता साधला खडसेंवर निशाणा
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय. गुलाबराव पाटीलांनी रविवारी जळगावात अजिंठा विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी काळातील जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढेल किंवा महाविकास आघाडी म्हणून लढेल असा प्रश्न मंत्री पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, प्रत्येक पक्षात नारद असतो त्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील इतर पक्षातील जे नारद आहेत. त्यांना सांभाळलं तर जळगाव जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जातील. अशाप्रकारे बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे उदाहरण समोर ठेवत गुलाबराव पाटील खोचकपणे एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून स्वबळावर निवडणूक लढण्याबाबतचे स्थानिक पातळीवर देण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष स्वतंत्र लढले.आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरुन जे आदेश येतील ते आदेश सर्व पक्ष पाळतील, अशी अपेक्षा आहे”, अशी भूमिका गुलाबरावांनी मांडली.
आगामी निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवरूनचे आदेश येतील त्या आदेश सर्व पक्ष पाळतील अशी अपेक्षा आहे. राज्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील चित्र बघितलं तर राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुक झाल्या. त्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष झाले असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी अशी भूमिका मांडली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम