रेखा रूपचंद महाजन यांना तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | जळगाव शहरातील चोपडा तालुक्यातील धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनियर कॉलेजच्या प्रा. रेखा रूपचंद महाजन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. रेखा रूपचंद महाजन यांना नुकताच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव आयोजित “तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारने” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एस.महाजन, धानोरा हायस्कूलचे चेअरमन सुखदेवराव पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, प्रदीप महाजन, बाजीराव पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, देविदास महाजन, एस. पी. महाजन आदींनी अभिनंदन केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम