भुसावळात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | भुसावळ शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
रविवार, ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी दुपारी दोन वाजता ट्यूटशनला आली होती.
यावेळी कुणीही उपस्थित नसल्याची संधी साधून संशयीत आरोपी तथा सेवानिवृत्त शिक्षक जयंत रायन वय ७५, याने पीडीत मुलीवर अत्याचार केला. घडलेला प्रकार पीडीतेने घरी आल्यानंतर आईला सांगितला. त्यानंतर सोमवार, ७ रोजी पीडीतेच्या कुटुंबियांनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला.या प्रकरणी संशयीत आरोपी जयंत रायनवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग 5 सीसीटीएनएस गुरंन १४१/२०२२ भादंवि ३७६ (अ.ब) , (३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५ प्रमाणे जयंत रायन या नराधम सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. अधिक तपास निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम