युध्दाच्या काळात सोन्याने केला ५३ हजारांचा टप्पा पार
खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | रशिया-युक्रेन संकटाने इक्विटी मार्केटला मोठा फटका बसला आहे आणि तेलाच्या किमती 14 वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असल्याचे दिसून आले.
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज जळगाव सुवर्ण नगरीत सकाळच्या सत्रात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८१० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या प्रति तोळ्याचा दर ५४ हजराच्या दिशेने जात आहे.२४ फेब्रुवारीला सोन्याचे दर यावर्षी ५३ हजारांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले, तर चांदीने ५ मार्चला ६९ हजार ३०० रुपयांवर उसळी घेतली.
जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,७९० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ७०,७८० रुपये प्रति किलो इतका आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. जागतिक परिस्थितीत सोने पुन्हा एकदा 56 हजारांचा टप्पा पार करील असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते.
वाढत्या दरासोबतच ग्राहकांची सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने लोक सोने खरेदी करीत आहेत. आणखी दरवाढीच्या शक्यतेमुळे ग्राहकांना सोने खरेदीची संधी आहे. दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम