कृषी खत कंपनीतील अधिकाऱ्यांच्या काळा बाजाराची पोलखोल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ मार्च २०२२ | अनेक खत कंपनी बनावट पद्धतीने अयोग्य रीतीने खत विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे.असाच प्रकार जळगाव येथे घडला. कृषी खत कंपनीच्या जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने काळा बाजार करून खतांची विक्री केली. तर कृषी खत कंपनीने वितरकांशी संगनमत करून विनानोंदणीच्या कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करून कंपनीला चक्क एक कोटी ३० लाखांचा गंडा घातला आहे.

पुण्यातील एका कंपनीत झोनल सेल्स मॅनेजर पदावर वैभव कमलकिशोर राठी कार्यरत आहे. कंपनीच्या ध्येय धोरणानुसार ही कंपनी केवळ नोंदणीकृत कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करते. जिल्ह्यासाठी जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे मालक राधेश्याम सूरजमल व्यास व नितीन मदनलाल व्यास यांच्याशी (वर्ष २०११ ते २०१८ पर्यंत) करार करण्यात आला होता.

मात्र, जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे नाव बदलून राधेश्याम सूरजमल व्यास या नावाने त्यांनी नवीन फर्म सुरू केली. सूरजमल व्यास यांनी करारानुसार कंपनीकडून आलेला माल गुदामात साठवून त्याची विक्री सुरू केली. शनिपेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

२०१६ पासून आजपर्यंत राधेश्याम सूरजमल व्यास यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीसोबत ट्रान्स्पोर्टर म्हणून काम केले. परंतु केलेला कराराच्या भंग करून त्यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी पाठविलेला एक कोटी ३० लाख ७७ हजार ३६९ रुपयांचा खतांचा माल योगेश नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून परस्पर शेतकऱ्यांना विक्री केला.

तसेच योगेशने बनावट पोच पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी राधेश्याम सूरजमल व्यास, नितीन मदनलाल व्यास व योगेश नरेंद्र जाधव (तिघे रा. जळगाव) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like