विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण आवश्यक -रवींद्र कुलकर्णी
खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे दुसरे वक्ते व नवीन शैक्षणीक धोरण-२०२० अंमलबजावणीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे उपस्थित होते.
यावेळी या कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धाेरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले.
टास्क फोर्सचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, सध्याची शिक्षणपद्धती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित तसेच शिक्षणक्षेत्रात त्यामुळे होणारे आमुलाग्र बदल अशा विविध पैलूंची सविस्तर माहिती देत सांगितले कि या धोरणात पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांचे असू शकते आणि या कालावधीत अनेक निर्गमन पर्याय आणि योग्य प्रमाणीकरण असू शकते. या धोरणात अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटची स्थापना केली जाईल जेणेकरून आपले शिक्षण हस्तांतरित करता येईल. तसेच आपल्या शैक्षणिक क्रेडिटची एक बँक स्थापन करून ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्था मधून त्यांच्या शैक्षणिक काळात कमावलेली क्रेडिट अंतिम पदवीच्या वेळी संग्रहित आणि हस्तांतरित करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल. तसेच नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे एक शिखर संस्था म्हणून काम करेल जी मजबूत संशोधन संस्कृती वाढवेल व उच्च शिक्षणासाठी संशोधन क्षमता निर्माण करेल.
कार्यशाळेचे समन्वयक एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख रफिक शेख व प्रा. तन्मय भाले, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. डॉली मंधान, प्रा. योगिता पाटील, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. कल्याणी नेवे हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल त्रिवेदी यांनी केले. तसेच या कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम