काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

सुरुवातीला समन्वयिका सौ.स्वाती अहिरराव सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.जयश्री चौधरी च्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त इयत्ता १ली साठी कथा वाचन, इयत्ता २ री साठी वृत्तपत्रातील बातम्यांचे वाचन, इयत्ता ३री साठी अभिवाचन, इयत्ता ४थी साठी छोट्या गोष्टींच्या पुस्तकांचे पुनरावलोकन, इयत्ता ५ वी साठी आत्मचरित्रांच्या पुस्तकांचे पुनरावलोकन इत्यादी उपक्रम शाळेत घेण्यात आले.

भौतिकी बारी या विद्यार्थिनीने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची वेशभूषा करून त्यांच्या विषयी माहिती सांगितली. सोहम देशपांडे या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयिका सौ. स्वाती अहिरराव यांनी वाचनाचे महत्त्व सांगून उपक्रमांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तनया चौधरी या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन सादर केले. पुनम पाटील, ज्योती देशमुख ह्या कार्यक्रम प्रमुख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like