जळगाव जिल्ह्यात दोन दिवस राज्यपालाचा दौरा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवस जळगाव दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसात ते जैन हिल्स आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाला भेटी देणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे जळगाव एयरपोर्टवर आगमन होणार आहे. नंतर ते जैन हिल्स येथे मुक्कामाला राहणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

जिल्हा प्रशासनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा दौरा असून यानुसार दौर्‍यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली जात आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like