भाजप नाशिक महापालिकेची जबाबदारी सांभाळणार आमदार गिरीश महाजन
खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपला दणदणीत यश मिळवून दिले असून यंदा ही कामगिरी रिपीट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडून मध्यंतरी नाशिकची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. ती माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण होत. महाजन यांचे पक्षातील महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात होते. गिरीश महाजन यांच्या कार्यशैलीमुळे तळागाळापर्यंत भाजपचे कार्य पोचण्यास मदत झाली. महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता तर मिळालेच त्याशिवाय जिल्ह्यातील पालिका, नगर परिषदा व जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आले. भाजपला एकापाठोपाठ यश मिळण्यात महाजन यांचा मोठा वाटा राहिला.
भाजपने कामगिरी पाहून त्यांच्यावरच पुन्हा नाशिकची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
गेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही या निवडीमुळे पक्षाला नाशिकमध्ये बळ मिळेल. सहप्रभारी म्हणून गिरीश महाजनांच्या खांद्याला खांदा लावून भाजपला पुन्हा एकदा निर्भेळ यश मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नाशिक ही अतिशय महत्वाची महापालिका असल्यामुळे येथील सत्ता कायम राखण्याची जबाबदारी देखील आपसूकच गिरीशभाऊंवर आली आहे.
आमदार गिरीशम महाजन हे आधी गोवा तर सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या प्रचाराला गेले आहेत. मार्च महिन्याच्या प्रारंभी परत आल्यानंतर ते नाशिकची सूत्रे सांभाळतील अशी अपेक्षा आहे. अलीकडच्या काळात भाजपमधून कार्यकर्ते कमी होत असून हे थांबवून पक्षाची सत्ता कायम राखण्याचे काम आमदार महाजन यांना करावे लागणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम