अभ्यासाच्या तणावातून 14 वर्षीय मुलाने केली आत्महत्या
खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगरातील ही घटना सर्वांना धकका देण्यासारखी आहे. तेथील एका 14 वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केली. अभ्यासाच्या तणावातून त्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर त्या तरुणास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्या रूग्णालयात त्याला मृत घोषित केले, तरीही त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह घरी नेला व पोलिसांचा विनंती ने पुन्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला.
जिल्हा पोलिसमुख्यालयातील शस्त्रागार विभागातील कर्मचारी प्रवीण सोनावणे हे पत्नी ,मुलगा, मुलगी आईसोबत वास्तव्यास राहत होते. त्यातील त्यांचा हा मुलगा होता. त्याचा नाव प्रेम होतं. तो सेट लॉरेन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता.
गुरुवारी दुपारच्या सुमारास प्रेमने घरातील बेडरूम मध्ये छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली ही घटना कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी प्रेम ला लगेचच खाली उतरवत नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी प्रफुल पाटील यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तो घोषित करण्यात आले.
खासगी रुग्णालयात प्रेमला मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर.एस. क्षीरसागर. श्री सोनार यांच्यासह रविंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम