रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात आज कच्च्या तेलाच्या दर स्थिरावले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवडाभरात मोठी वाढ झाली आहे.भारतात देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. देशात एकाच दिवसात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. मात्र तूर्त निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर आहे. आज शनिवारी २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारला 1 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन देशातील संघर्षाचा आणि युदधाची झळ व फटका भारतला बसला आहे.

आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. देशात गेल्या ११४ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. येत्या काळात देशात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like