गुंगीचे औषध देता अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | जळगाव शहरापासून जवळच राहत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील एक 14 वर्षे मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती गावातील एका साबीर शेख जरूर या मुलाशी तिची ओळख होती. ओळखीचा आणि समाजात असलेल्या स्थानाचा फायदा घेत त्याने 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान त्या मुलीला सातत्याने आपल्या घरी बोलविले व बोलवण्याच्या निमित्ताने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी लगेचच एमआयडीसी पोलिसात धाव घेतली.

पोलीस कायदा अंतर्गत त्या गुन्हेगाराला शोधण्यात यश येऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला व त्याला उपनिरीक्षक रवींद्र गिरासे यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली. त्याच्यावर अद्यापही चौकशी सुरू आहे आज शनिवारी दुपारी त्याला ठाण्यात हजर करणार असून यावर पुढील सुनावणी काय असणार याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like