मुहूर्त काढून देखील रस्त्याचे काम अपुरे, खडीने व्यापलेला रस्ता अशी दुर्वस्था

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | पांडे डेअरी ते इच्छादेवी चौकापर्यंतच्या सिंध कॉलनी मार्गाची दुर्व्यस्था अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील शेतरस्त्या पेक्षाही ही परिस्थिती वाईट झाली आहे. त्यातच या रस्त्याचे काम करायच्या नावाखाली दोन महिन्यांपासून रस्त्याच्या दुतर्फा बाजूस खडीचे ढीग टाकून ठेवले आहेत, ज्याचा त्रास प्रवाशी व नागरिकांना होत आहे.

शहरातील अन्य रस्त्यांच्या दूर व्यवस्थे प्रमाणे महापालिका प्रशासन याबाबतीत दुर्लक्ष करताना दिसत आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण रस्ता पेक्षाही बिकट आहे. किंबहूना जळगावात रस्ते नावाचा प्रकार शिल्लक नाही असे दिसून येते. त्यातही काही रस्त्यांबाबत तर बोलायलाच नको. सर्व जागी खड्डे खड्डे झाले आहे. त्यातील पांडे डेअरी ते इच्छा देवी चौक पुढे थेट डीमार्ट पर्यंतच्या रस्त्याची अवस्था तर अत्यंत भीषण आहे. चालणे कठीण. वाहतूक कोंडी, वायू प्रदुषण अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्ते कामांच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या रस्त्यासह प्रमुख रस्त्यांच्या कामाचे मुहूर्त काढले आहेत परंतु त्या मुहूर्तावर या रस्त्यांची कामे अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही आहेत. यावर मनपा ने लक्ष द्यावे असे स्थानिक रहिवाशी व नागरिकांचे ठोस मत आहे.

हजारो वाहने दिवसभर ये-जा करतात. रात्री अकरापर्यंत व त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरूच असते. त्यामुळे रस्त्याची अवस्था खड्ड्यांची झाली असून, येथील रस्त्यालगत हॉस्पिटल आहे. आणि या मार्गावरून प्रचंड धूळ उडते, त्याचा हॉस्पिटल मधील रुग्णांना होत आहे. सोबत स्थानिक रहिवाशी यांना देखील हा त्रास उद्भवत आहे. मात्र तरी देखील मनपा प्रशासन मात्र याबाबत कमालीचे उदासीन व धिम्म आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like