लग्नात संसारोपायोगी गोष्टी न दिल्याने पत्नीचा कुटुंबीयांकडून छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | लग्नात संसार उपयोगी वस्तू दिल्या नाहीत, वरून मूलबाळ होत नाही या कारणावरून विवाहितेवर सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप समोर आला आहे. आणि या विरोधात शुक्रवार 25 फेब्रुवारी दुपारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात विवाहतीच्या पतीसह आणखी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

रामानंद नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव शहरात खंडेराव नगरातील माहेर असलेल्या आयशा सद्दाम पिंजरी यांचा विवाह मध्यप्रदेशातील बटवाडी येथील सद्दाम लतीब पिंजारी यांच्याशी सन 2018 मध्ये झाला. अवघ्या लग्नाच्या तीन ते चार महिन्यानंतर विवाहीतेला तुझ्या आई वडिलांना लग्नात संसार उपयोगी चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. या कारणावरून वरून त्या विवाह तिचे छळ करण्यात आले. शिवाय तुला मूळ बाळ होत नाही तुला आजार आहे का असे बोलून शिवीगाळ सह शारीरिक व मानसिक दृष्ट्या त्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या झाडामागे तीचे सासु सासरे दीर मोठे सासरे मोठे सासू नणंद नंदोई यांचा समावेश होता.

हा छळ त्या विवाहितेला सहन न झाल्याने ती तिच्या माहेरी निघून गेली त्यानंतर तिने तिच्या कुटुंबा विरोधात गुन्हा दाखल केला व काल 25 फेब्रुवारी रोजी त्या सर्वांना अटक करण्यात आले. त्यावर कारवाई सुरू आहे. यातून पुढे काय समोर येते हे लवकरच पोलिसांच्या कारवाईतून समजेल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like